स्व.आण्णासाहेब पाटील यांना अभिप्रेत माथाडी कायदा व कामगार निर्माण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल : कामगार नेते इरफान सय्यद 

 

पिंपरी : अंगमेहनतीचे काम करणा-या डोक्यावर भार वाहून नेणा-या माथाडी, मापाडी हमाल कामगारांच्या जिवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी तसेच त्याचे जिवन सुखमय करण्यासाठी त्यांना संघटीत करून त्याच्या हक्कासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे माथाडी कामगारांचे दैवत स्व. आण्णा साहेब पाटील यांची आज पुण्यतिथी त्यानिमीत्ताने केसबी चौकातील स्व.आण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सल्लागार समिती सदस्य, शिवसेना सहसंपर्कप्रमुख इरफानभाई सय्यद, सल्लागार श्री.बाळासाहेब शिंदे, पुणे माथाडी बोर्ड सदस्य श्री.परेश मोरे , पिंपरी चिंचवड माथाडी बोर्ड सदस्य श्री प्रविण जाधव,भिवाजी वाटेकर खंडु गवळी पांडुरंग काळोखे सर्जेराव कचरे, आप्पा कौधरी, सतीश कंठाळे गोरक्ष दुबाले, आबा मांढरे, समर्थ नायकवडे तसेच माथाडी कामगार उपस्थित होते. 

पिंपरी चिंचवड शहरासोबतच पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र मजदूर संघटना हि स्व.आण्णासाहेब पाटील यांना अभिप्रेत असणा-या माथाडी कायद्याची अमंलबजावणी करण्यात करण्यासाठी कार्यरत आहे माथाडी कामगारांच्या समस्या व प्रश्न माथाडी मंडळाच्या माध्यमातून सोडवून आपल्या माथाडी कामगार बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र मजदूर संघटना व त्यांचे पदाधिकारी करीत आहे. आमचे दैवत स्व.आण्णासाहेब पाटील यांना अभिप्रेत असणारा माथाडी कायदा व माथाडी कामगारांचे सुखमय जिवन त्यांना देण्यासाठी मी व माझी महाराष्ट्र मजदूर संघटना प्रयत्नशील राहील हीच खरी स्व.आण्णासाहेब पाटील यांना पुण्यतिथी दिनानिमित्ताने श्रद्धांजली राहिल. असे कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी सांगितले