एमएसएमईंच्या डिजिटल परिवर्तनासाठी ट्रेड इंडियाचा पुढाकार

 

हरियाणा सरकारसोबत केला करार

मुंबई : ट्रेडइंडिया हा देशातील सर्वात प्रमुख बीटूबी आणि ऑनलाइन मार्केट प्लॅटफॉर्म असून या प्लॅटफॉर्मने हरियाणाचे मा. मुख्यमंत्री श्री मनोहर लाल यांच्या मार्गदर्शनाखाली हरियाणा सरकारसोबत नुकताच एक करार केला. अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना डिजिटल स्वरुपात सक्षम करण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री दुष्यंत चौटाला यांच्या उपस्थितीत ट्रेड कंपनीने हरियाणाच्या एमएसएमई संचलनालयाशी सामंजस्य करार केला. याद्वारे उद्योगांना आवश्यक तंत्रज्ञान, नूतनाविष्काराच्या मदतीने बिझनेसमधील कामगिरी, उत्पादकता आणि बाजारातील महसूल वाढवण्यास मदत केली जाईल.

देशातील असंख्य एमएसएमईच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी समर्पित असलेल्या अत्याधुनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे आणि डिजिटल खाता सेवा यूझरच्या गरजांनुसार वैयक्तिकृत केल्या जातात. हा प्रमुख ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि हरियाणा सरकारच्या भागीदारीतून नवोदित व्यवसायांना उत्कृष्टतेच्या उंचीवर पोहोचण्यास मदत केली जाईल.

दोन पक्षांमधील सामंजस्य करारानुसार, ट्रेड इंडियाकडून हरियाणातील एमएसएमईंसाठीचे विविध जागृती कॅम्पेन आयोजित केले जातील. लघु व मध्यम उद्योजकांना ऑनलाइन स्वरुपात परिवर्तन करण्यासाठी तसेच बाजारपेठेतील संभाव्य वृद्धी गाठण्याकरिता मासिक मास्टर क्लाससह गो डिजिटल वेबिनार्सदेखील या प्लॅटफॉर्मकडून घेतले जातील.

हा प्रमुख ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, नव्या काळातील कस्टमाइज्ड टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म विकसित करून विक्रेत्यांना ऑनबोर्डिंग मदत करेल. यासोबतच, ही कंपनी ऑनलाइन प्रोफाइल तयार करण्यासाठी मदत करेल. तसेच ५० उत्पादनांचे मोफत प्रमोशन करून नव्या खरेदीदारांमध्ये लक्षणीय वाढ करण्यासाठी मदत करेल. हरियाणातील एमएसएमईंनादेखील ट्रेड इंडियाच्या आधुनिक ऑनलाइन बिझनेस प्लॅटफॉर्मवर विनामूल्य कंपनीचे प्रोफाइल पेज प्राप्त करू शकतील.

या भागीदारीबद्दल बोलताना माननीय उपमुख्यमंत्री म्हणाले, “ आमचे सरकार उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, राज्यात सर्वसमावेशक आणि संतुलित प्रादेशिक विकास वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. नुकत्याच झालेल्या धोरणात्मक सहकार्याने राज्यातील दुर्गम भागातील एमएसएमई, कारागीर यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेशास मर्यादा आणणाऱ्या आव्हानांवर मात करण्यास मदत होईल. यामुळे वर्तमानातील उद्योजकांच्या विक्रीसाठी चालना मिळेल, एवढेच नाही तर नवीन उद्योजकांना अभूतपूर्व संधीही मिळतील. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही देशातील तसेच विशेष उत्पादनांची दृश्यमानता मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यात औद्योगिक उत्पादने किंवा पारंपरिक हस्तकलेच्या उत्पादनांचाही समावेश आहे. याद्वारे ‘ब्रँड हरियाणा’ ला अधिक बळकटी मिळेल.”