पी व्ही सिंधुचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेबल टेनिसमध्ये भारताचे अचंत शरथ कमल आणि मनिका बात्रा यांनी आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी काल दोहा इथं झालेल्या सामन्यात सिंगापूरच्या कोएन पँग यू एन आणि लिन ये यांचा 4-2 असा पराभव केला.

अचंत आणि मनिका यांचा आज कोरियाच्या सांग-सू ली आणि जिऊन यांच्याशी लढत होईल. या सामन्यात जिंकणारा संघ टोकियो ऑलिंपिक्समध्ये प्रवेश करणार आहे.

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिनं ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूनं काल जपानची अकेन यामागुची हिला उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत करून आगेकूच कायम ठेवली आहे.

सिंधूनं पहिला गेम 16-21 असा गमावल्यानंतर पुढचे दोन्ही गेम 21-16 आणि 21-19 असे जिंकले. तिची आज थायलंडची पॉर्नपावी चोचुवोंग हिच्याबरोबर लढत होईल. दरम्यान, पुरुषांच्या एकेरी उपांत्यपूर्व फेरीत भारताचा लक्ष्य सेन नेदरलँड्सचा मार्क काल्जो याच्याकडून पराभूत झाला. 

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image