अभिनेता सुशांतसिंह याची बहिण प्रियंका सिंह हिच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यू प्रकरणात त्याची बहिण प्रियंका सिंह हिच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे.

प्रियंका हिनं एका डॉक्टरच्या मदतीनं सुशातसिह याला द्यायच्या मनोविकारावरच्या औषधांचं खोटं प्रिस्क्रिप्शन बनवलं असा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणात प्रियंकाविरोधात प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध आहेत, त्यामुळे तिच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करता येणार नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे.

दरम्यान न्यायालयानं सुशांत याची दुसरी बहीण मीतू सिंह हिच्या विरोधातला गुन्हा रद्द करायची मागणी मात्र मान्य केली. या प्रकरणात प्रियंका, मीतू आणि दिल्लीतल्या आर.एम.एल. रुग्णालयातले डॉक्टर तरुण कुमार यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता.