वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं झालेल्या गर्दीप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं काल झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

वाशीम जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून याबाबत अहवाल मागविण्याच्या सूचनाही त्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत