कोरोनावर मात करण्यासाठी भारताकडून अनेक देशांना लशीचा पुरवठा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना वर मात करण्यासाठी भारताकडून अनेक देशांना लशीचा पुरवठा केला जात आहे.व्हेक्सीन मैत्री अंतर्गत,डॉमनिक इथं लस पोहचली आहे.डॉमनिक रिपब्लिकचे पंतप्रधान रूजवेल्ट स्केरिट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील जनतेचे आभार मानले आहेत.

पहिल्या खेपेत ३५ हजार मात्रा मिळाल्यानंतर आपल्याला इतक्या लवकर लस मिळेल असं वाटलं नव्हत असंही स्केरिट यांनी म्हटलं आहे.७२ हजार लोकसंख्या असलेल्या डॉमनिकच्या  अर्ध्या जनतेला यामुळे लस घेता येणार आहे. बार्बाडोसलाही लशीच्या मात्रा नुकत्याच पुरवण्यात आल्या.

व्हेक्सीन मैत्री अंतर्गत,भारताकडून जगभरातल्या २५ देशांना २ कोटी ४० लाख मात्रा पुरवल्या जाणार असून यात शेजारील देशांबरोबरच युगांडा, इक्वेडोर, निकारागुआ, मोरक्को आणि नामीबिया यांचाही समवेश आहे.