नौदलाचे आयएनएस प्रलय हे जहाज अबू धाबी इथं दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेव्हडेक्स-२१ आणि इंडेक्स २१ या आंतरराष्ट्रीय नौदल सुरक्षा प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाचे आयएनएस प्रलय हे जहाज काल संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी इथं दाखल झाले. हे प्रदर्शन आजपासून २५ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. आयएनएस प्रलय हे संपूर्ण भारतीय बनावटीचे प्रबळ या गटातील क्षेपणास्त्र वाहक जहाज आहे. भारत आणि अबू धाबी दरम्यानचे द्विपक्षीय संबंध ; संरक्षण क्षेत्रांतल्या  व्यापक धोरणात्मक भागीदारीनंतर सुदृढ होत आहेत.अबू धाबीचे युवराज शेख मोहम्मद बीन झायद अल नाहयान २०१७ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  त्यावेळी या संबंधांना नव्याने चालना मिळाली.