भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्य़ाच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या ५७८ धावा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंच्या संघानं ५७८ धावांचा डोंगर उभारला. आज तिसऱ्या दिवशी कालच्या ८ गडी बाद ५५५ धावसंख्येवरून पुढे खेळताना इंग्लंडनं त्यात २३ धावांची भर घातली.

भारताच्या वतीनं जसप्रित बुमराह आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी ३ तर इशांत शर्मा आणि शाहबाझ नदीम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 

त्यानंतर पहिल्या डावासाठी मैदानात उतरलेल्या भारताची फलंदाजी मात्र गडगडली.  भारतानं केवळ ७३ धावांमधेच सलामीवीर रोहित शर्म आणि शुभमन गीलसह, कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे यांना गमावलं. मात्र चेतश्वर पुजारा याच्या संयमी तर ऋषभ पंतच्या आक्रमक अर्धशतकी खेळीनं भारताचा डाव सावरला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं ४ गडी बाद १७६ धावा केल्या होत्या.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image