जागतिक शाश्वत विकास शिखर परीषदेचं आज प्रधानमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संध्याकाळी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जागतिक शाश्वत विकास शिखर परीषदेचे उद्घाटन होणार आहे.

"सर्वांच्या भविष्यासाठी सुरक्षित आणि संरक्षित पर्यावरण " ही या परिषदेची संकल्पना आहे. द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटने या २० व्या परिषदेचे आयोजन केले असून, हवामान बदलाच्या विरोधातील लढाईसाठी या परिषदेत विविध देशातल्या प्रतिनिधींसोबतच व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ, हवामानशास्त्रज्ञ, युवक सहभागी होण्याची शक्यता आहे.

गयानाचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद इरफान अली, पापुआ न्यू गिनी चे प्रधानमंत्री जेम्स मारापे, मालदीवच्या पीपल्स मजलिसचे अध्यक्ष मोहम्मद नशीद, संयुक्त राष्ट्राच्या उपमहासचिव अमिना जे. मोहम्मद आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, नवीन आणि नविकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्याने ही परिषद होत आहे.