मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढल्यानं पालिकेनं कारवाईची मोहीम हाती घेतली, या मोहिमेमुळे मास्क लावणाऱ्यांचं प्रमाण आता वाढत असल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केला आहे, मास्क न लावणाऱ्यांचं प्रमाण सुमारे ४० टक्क्यानी कमी झालं आहे. दरम्यान, आतापर्यंत १२ लाख ९४ हजार ३१२ जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून २६ कोटी २४ लाख ९२ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे.