भारताने आपल्या नागरिकांसोबतच १००हून अधिक देशांमधल्या नागरिकांचा जीव वाचवण्याचे काम केले - अर्थमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाकाळात वैद्यकीय पातळीवर केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.

सध्या देशात दोन लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून आपल्या नागरिकांसोबतच, जगभरातल्या १००हून अधिक देशांमधल्या नागरिकांचा जीव वाचवण्याचे काम सरकारने सुरु केले असल्याचे त्या म्हणाल्या.

येत्या काळात कोविड-१९ प्रतिबंधक आणखी दोन लसी उपलब्ध होण्याची आशा असल्याचे त्या म्हणाल्या.