पानमसाला, गुटखा बंदी कडक करण्यासंदर्भात राज्याला उच्च न्यायालयाची नोटीस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं पानमसाला, गुटखा बंदी कडक करण्यासंदर्भात पोलीस आणि राज्य प्रशासनाला नोटीस जारी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या तांभेरे इथले सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी पानमसाला गुटखा बंदी कडक करण्यासाठी न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे.

पानमसाला, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ बंदी बाबतच्या कार्यवाहीसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांनी विशेष पथक स्थापन करावं, पोलीस प्रशासनानं अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यवाही करावी, तक्रारीसाठी टोल फ्री नंबर ची सुविधा चालू करावी आणि बोगस कारवाई करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.