इंग्लंडचा कर्णधार जो रूट द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लड दरम्यान चेन्नईत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं आपल्या पहिल्या डावात आज ८ बाद ५५५ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा डोम बेस २८ तर जॅक लिच ६ धावांवर खेळत आहेत.

कालच्या ३ बाद २६३ धावांवर इंग्लंडनं आज आपला पहिला डाव सुरु केला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट आपल्या शंभराव्या कसोटीत द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. बेन स्टोक्सनं ८२ धावा करत त्याला योग्य साथ दिली. भारतातर्फे इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि शाहबाझ नदीम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.