भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज तिसरी बैठक
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची तिसरी बैठक आज होणार आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टोकियो इथं झालेल्या बैठकीतील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर पुन्हा चर्चा करून त्यांच्या अंमलबजावणीवर यात भर दिला जाणार आहे.
भारत- प्रशांत क्षेत्र मुक्त आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर यात चर्चा होण्याची अपेक्षा आहे. कोविड १९ संकटाशी सामना करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना तसंच हवामान बदला संदर्भातही यावेळी चर्चा होणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.