सरकारने सांगितलेल्या सर्व ट्विटर हँडलवर कारवाई करावी लागेल- केंद्र सरकार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटरचे स्वत:चे नियम असतील, परंतू भारतात भारतीय कायद्यांचा आदर करावाच लागेल, तसंच सरकारनं सांगितलेल्या सर्व ट्विटर हँडलवर कारवाईही करावी लागेल, असं केंद्र सरकारनं ट्विटरसमोर स्पष्ट केले आहे.

ट्विटरचे वरिष्ठ अधिकारी तसंच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांची काल बैठक झाली. यांनतर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं ट्विटरविरोधात आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली हे अकाउंट चुकीची आणि चिथावणीखोर माहिती पसरवत असल्याचा दावा सरकारनं केला आहे.