देशात गेल्या चोविस तासात १२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोविस तासात १२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ७ लाख ६३ हजार ४५१ झाली आहे. गेल्या चोविस तासात १६ हजार ४८८ नवे रुग्ण आढळले.

रुग्णांची एकूण संख्या १  कोटी १० लाख ७९ हजार ९७९ झाली आहे. सध्या १ लाख ५९ हजार ५९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल ११३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.