प्रधानमंत्री तमिळनाडू आणि केरळ राज्यांचा दौरा करणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या तमिळनाडू आणि केरळ या राज्यांचा दौरा करणार आहेत.

उद्या सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ते चेन्नईमध्ये  विविध प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. तसेच, त्यांच्या उपस्थितीत अर्जुन हा रणगाडा लष्करामध्ये दाखल होणार आहे.

हा रणगाडा स्वदेशी बनावटीचा आहे. दुपारी साडे तीनच्या सुमारास प्रधानमंत्री मोदी हे कोची येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण करणार असून काही प्रकल्पांचे भूमिपूजनही करणार आहेत.