मुंबई शहरात विना मास्क फिरणाऱ्यांकडून चलन देऊन दंड वसूल करण्यात येणार
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून यापुढे चलन देऊन दंड वसूल करण्यात येणार आहे, असं मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. आत्तापर्यंत हेल्मेट न वापरणाऱ्या तसंच सीट बेलट न लावणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड घेतला जात होता. आता मास्क न लावणाऱ्यांकडून २० रुपये दंड वसूल केला जाणार आहे, असं ही सिंग यांनी सांगितलं.
दरम्यान मुंबई महानगर पालिकेनं काल एका दिवसात मास्क न लावणाऱ्या १६ हजार १५४ जणांकडून ३२ लाख रुपये दंड वसूल केला. शहरातील जिमखाने, क्लब, उपहार गृह, सिनेमा हॉल इथं काटेकोर चाचपणी करून करोनासंबधी नियमांचं पालन न करणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई केली. अंधेरी तसंच वांद्रे भागातून सर्वात जास्त दंड वसूल करण्यात आला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.