मुंबई उपनगर जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या पोलीस ठाणे इमारतींच्या कामाचा आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हा विकास निधीतून बांधण्यात येणाऱ्या पोलीस ठाणे इमारतींच्या कामाचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंत्रालयात आढावा घेतला.

उपनगरामध्ये जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वाकोला, मेघवाडी, गोरेगाव आणि मालाड पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामाकरिता ३७ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मान्य करण्यात आला आहे.

त्यापैकी ८ कोटी रुपयांचा निधी राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ यांना वर्ग करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ही कामं गतिमान करण्याच्या सूचना ठाकरे यांनी त्यावेळी दिल्या. या बैठकीला गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर, अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.