परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या १०४ विद्यार्थ्यांची निवड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या १०४ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यात ठाण्यातल्या हवाई दल केंद्रावरच्या केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी जावळे हिचाही समावेश होता.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा परीक्षेच्या तयारीत खूप उपयोग झाल्याचे तिने आकाशवाणीशी बोलताना सांगितले. परीक्षेच्या आधी पालक अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांवर खूप दबाव आणतात. मात्र परीक्षा पे चर्चा कार्यक्रमानंतर हे योग्य नसल्याची पालकांचीही खात्री पटल्याचे तिने सांगितले.