प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्यमिळायला हवं, मात्र प्रसारमाध्यमांनी आपली जबाबदारी सांभाळून काम करवं - प्रकाश जावडेकर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पंचावन्नाव्या अधिवेशनाचं आज पुण्यात जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्यमिळायला हवं, मात्र त्यांनीही आपली जबाबदारी सांभाळून काम करावं, असं जावडेकरयांनी यावेळी सांगितलं. 

समाजात खोटी माहिती पसरवणं चांगलं काम नाही असं तेम्हणाले. जावडेकर यांनी आपल्या जडणघडणीवरचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्याअसलेल्या प्रभावाचाही उल्लेख केला. यावेळी जावडेकर यांनी, कामाचा आनंद घेण्यासाठी काम करावं ही शिकवण आपल्याला विद्यार्थी परिषदेतूनचं मिळाल्याचं ते म्हणाले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भाई पटेलयांच्यासह विद्यार्थी परिषदेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.