देशात काल दिवसभरात ३ लाख २४ हजार जणांचे लसीकरण पूर्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरोधी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात, देशात काल दिवसभरात ३ लाख २४ हजार जणांना लस दिली असून आजपर्यंत ६६ लाख ११ हजार जणांना लस दिली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक २७ शतांश टक्यांवर पोचला आहे. काल दिवसभरात १३ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनातून बरे झाले त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकुण संख्या आता एक कोटी पाच लाख झाली आहे.

देशभरात कोरोनाचे ४१ हजार ५११ रुग्ण उपचाराधीन आहेत. देशात काल ११ हजार ६७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १ कोटी ८ लाख झाली आहे. काल ९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशात आतापर्यंत १ लाख ५५ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.