महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन

  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन

मुंबई : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नवनियुक्त मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.

मंत्रालयात आज श्री. थोरात यांनी त्यांच्या कार्यालयात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे नवनियुक्त अध्यक्ष मंदार पारकर, उपाध्यक्ष महेश पावसकर, कार्यवाह प्रमोद डोईफोडे, कोषाध्यक्ष नेहा पुरव आणि प्रवीण राऊत आणि कार्यकारिणी सदस्य हरिसिंग राजपुरोहित, अशोक अडसूळ, सोनू श्रीवास्तव, राजू झनके आणि मिलिंद लिमये यांचे अभिनंदन केले.

या दरम्यान श्री. थोरात यांनी कार्यकारिणीच्या कामाचे स्वरुप, कार्यकारिणी राबवित असलेले उपक्रम, भविष्यातील उपक्रम याविषयीची माहिती घेतली. नवीन कार्यकारिणी सन 2021 आणि सन 2022 अशा दोन वर्षासाठी काम करणार आहे.