एमजी मोटर इंडियाने नवी 'झेडएस ईव्ही २०२१' लॉन्च केली

 


मुंबई: एमजी मोटर इंडियाने नवी झेडएस ईव्ही २०२१ ही २०.९९ लाख रुपये किंमतीत (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) लॉन्च केली आहे. या अपडेट व्हर्जनमध्ये सर्वोत्तम वर्गात ४४.५ kWh हाय टेक बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यावर ४१९ किमी धावते. नव्या २१५/५५/आर१७ टायर्ससह सुसज्ज वाहन आणि बॅटरी पॅक ग्राऊंड क्लीअरन्स अनुक्रमे १७७ मिमी व २०५ मिमी एवढा आहे.

आपल्या भागीदारांसह देशभरात चार्जिंग इकोसिस्टिमचा विस्तार करत झेडएस ईव्ही २०२१ ही आता ३१ शहरांमध्ये बुकिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. जानेवारी २०२० मध्ये सुरुवातीला ही कार ५ शहरांमध्ये लाँच करण्यात आली होती.

एमजी झेडएस ईव्ही ही १४३ पीएस पॉवर आणि ३५० एनएम टॉर्सह येते तसेच ती ० ते १०० kmph अंतर ८.५ सेकंदात पोहोचू शकते. ही कार एक्साइट व एक्सक्लुझिव्ह प्रकारात उपलब्ध आहे. भारतातील पहिली शुद्ध इलेक्ट्रिक इंटरनेट एसयुव्ही म्हणून तिच्यावर एमजीचे जागतिक संकेत असून त्यात अनेक नावीन्यपूर्ण सुविधा आहेत. या सुविधांमध्ये पॅनोरमिक सनरुफ, १७ इंच डायमंड कट अॅलॉयव्ह िल्स आणि २.५ पीएम फिल्टर इत्यादींचा समावेश आहे.

झेडएस ईव्ही सोबत एमजीने आपल्या ग्राहकांना ५- वे चार्जिंग इकोसिस्टिम दिले असून घर किंवा ऑफिसमध्ये मोफत एसी फास्ट चार्जर, पोर्टेबल इन-कार चार्जिंग केबल, डीलरशिपसाठी डीसी सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन, २४x७ चार्ज-ऑन-द-गो सुविधा (५ शहरांमध्ये) व सॅटेलाइट शहर तसेच पर्यटन केंद्रांमध्ये चार्जिंग स्टेशन आहेत.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री राजीव छाबा म्हणाले, “ १ वर्षाच्या खूप कमी वेळात झेडएस ईव्ही ही क्रांतिकारी कार लाँच करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. याद्वारे इलेक्ट्रॉनिक वाहनांप्रति आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार होतो. आमच्या ग्राहकांना मालकीचा उत्कृष्ट अनुभव मिळण्यासाठी देशभरात आमच्या इकोसिस्टिम पार्टनर्ससोबत आम्ही मजबूत चार्जिंग सुविधा उभ्या करत आहोत.”

या कारनिर्मात्याने ‘इको ट्री चॅलेंज’ देखील आणले असून याअंतर्गत झेडएस ईव्ही मालक पर्यावरणीय उपक्रमात सहभागी होऊ शकतात. याद्वारे त्यांची CO2 सेव्हिंग आणि रिअल टाइममध्ये राष्ट्रीय क्रमवारी तपासू शकतात. एमजी झेडएस ईव्ही 2021 ही एमजी ईशील्ड सोबत संरक्षित असून, याद्वारे कारनिर्माता ८ वर्षांसाठी अमर्याद किमीकरिता ५ वर्षांची मोफत वॉरंटी/१.५ लाख किमी वॉटंरी बॅटरीपॅक सिस्टिमसाठी, ५ वर्षांसाठी राउंड-द-क्लॉक रोडसाइड असिस्टन्स  आणि ५ लेबर-फ्री सर्व्हिसेस दिल्या जातात.

Popular posts
मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती दिलासादायक – कृषिमंत्री दादाजी भुसे
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर
Image
जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती
Image