समुद्रावर उपजीविका असणाऱ्या कोळी बांधवाच्या समस्यांचाही विचार करावा- राज्यपाल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई विद्यापीठानं समुद्राच्या विविध पैलूंचा शास्त्रीय पद्धतीनं सर्वंकष अभ्यास करावा, तसंच समुद्र विज्ञानातल्या देशाच्या समृद्ध वारशाचंही पुनरुज्जीवन करावं, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई विद्यापीठानं स्थापन केलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन मरीटाईम स्टडीज’चं उद्घाटन राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत काल झालं, त्यावेळी ते बोलत होते.

या सागरी अध्ययन केंद्रानं समुद्राचा एकात्मिक अभ्यास करताना, समुद्रावर उपजीविका असणाऱ्या कोळी बांधवाच्या समस्यांचाही विचार करावा, तसंच येऊ घातलेल्या वादळांची योग्य पूर्वसूचना देण्याच्या दृष्टीनं हवामान खात्यासोबत सहकार्य प्रस्थापित करावं, असं राज्यपालांनी सांगितलं.

उद्घाटन सोहळ्याला नौदल प्रमुख अॅंडमिरल करमबीर सिंग, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे संचालक डॉ. शेखर मांडे, कुलगुरू सुहास पेडणेकर, तसंच केंद्राच्या प्रभारी संचालक अनुराधा मुजूमदार उपस्थित होत्या. 

 

 

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर
Image
जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती
Image
भारतीयांना डावलून परदेशात कोविशिल्ड या लसीची निर्यात केलेली नाही- आदर पूनावाला
Image