कोरोना चा वाढता प्रकोप लक्षात घेता आंदोलनं न करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

 

मुंबई (वृत्तसंस्था) :  राज्यात कोरोना चा वाढता प्रकोप लक्षात घेता आंदोलनं न करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भाजपानं येत्या २४ तारखेला वाढीव वीज बिलाच्या विरोधात राज्यभरात आखलेले जेलभरो आंदोलन स्थगित केलं आहे. भाजपाचे नेते  चद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात  वार्ताहार परिषदेत ही माहिती दिली. वाढीव वीज बिल माफिसाठी राज्यात ५६० ठिकाणी जेलभरो आंदोलन आणि ५० हजार कार्यकर्ते जेल मध्ये जातील अस नियोजन भाजपानं केलं होतं, मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला आम्ही प्रतिसाद दिला असून आता मुख्यमंत्री यांनी तात्काळ  वीज जोडण्या कापण्याच्य़ा कारवाईला स्थगिती द्यावी अशी मागणी ही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.  राज्यात पेट्रोलच्या दराबद्दल विचारले असता, राज्य सरकार जे ३८ रुपये पेट्रोल वर कर घेते तो रद्द करावा. अशी मागणी करुन, राज्य सरकार फक्त केंद्रावर बोट दाखवत असेल तर राज्य सरकार आहे तरी कशाला ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.