अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी समिती स्थापन केली जाणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मार्च महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विविध विभागांमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या दृष्टीनं एक सर्वसमावेशक समन्वय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली आहे.

या संदर्भात भुजबळ यांनी शिबिराचं आयोजन केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन आयोजित केलं जात असल्यामुळे या संदर्भात विशेष काळजी घेतली जात आहे, त्याच अनुषंगानं या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे हे या सर्वसमावेशक समितीचे मुख्य समन्वयक असतील. २६, २७ आणि २८ मार्चला हे संम्मेलन नाशिकला होणार आहे.