दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

  दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतीदिन. देशात आजमितीस हिंदीसह वेगवेगळ्या भाषांमध्ये हजारो चित्रपट दरवर्षी निर्माण होतात. भारतीय चित्रपटसृष्टी आज जगातील आघाडीच्या चित्रपटसृष्टींपैकी आणि वैभवाच्या शिखरावर आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया ज्यांनी रचला आणि आजचे वैभव ज्यांच्या दूरदृष्टीमुळे प्राप्त झाले त्या चित्रपटमहर्षी स्वर्गीय दादासाहेब फाळके यांना स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले.