मृत मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख, तर गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत प्रधानमंत्र्यांच्या राष्ट्रीय मदत निधीतून मंजूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दुःख व्यक्त केलं आहे. जखमींची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

मृत मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची, तर गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्र्यांच्या राष्ट्रीय मदत निधीतून मंजूर केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रावेर, अभोडे आणि विवरे इथं मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले.

Popular posts
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Image