नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विनम्र आदरांजली

  नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विनम्र आदरांजली

मुंबई: नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र आदरांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या संदेशात म्हणतात, “महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी, कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणण्याची महाराजांची इच्छा स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन पूर्ण करणारे शूरवीर, नरवीर तानाजी मालुसरे यांचा आज स्मृतिदिन. नरवीर तानाजींनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाला आणि ‘गड आला, पण सिंह गेला’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक उद्गारांना आज साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. स्वतःपेक्षा स्वराज्याला, भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या, आपल्या बलिदानाने स्वराज्याचा पाया भक्कम करणाऱ्या, शूरवीर, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली.”