आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. १९९९ मध्ये युनेस्कोने आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला होता. "बहुभाषिकांना शिक्षण आणि समाजात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे " अशी यावर्षीची संकल्पना आहे.

भारतात २०१५ पासून हा दिवस साजरा केला जात असून यावर्षीही केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं या निमित्त चार दिवस विविध कार्यक्रमांचं दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजन केलं आहे.

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू एका वेबिनारला संबोधित करणार असून एका आंतरराष्ट्रीय आभासी सुलेखन प्रदर्शनाचं उद्घाटनदेखील नायडू यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल हे देखील या वेबिनारमध्ये आपले विचार मांडणार आहेत. 

Popular posts
स्टडी ग्रूपची टीसाइड युनिव्हर्सिटीशी हातमिळवणी
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image