वी फाउंडर सर्कलची काऊचफॅशनमध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

 


मुंबई: वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्सना प्राथमिक निधी देण्याच्या आपल्या उपक्रमाला पुढे सुरू ठेवत काऊचफॅशन ह्या बी2बी फॅशन टेक कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. ई- कॉमर्स कंपन्यांना व फॅशन ब्रँडसना नवीन काळातील कंटेंट कॉमर्समध्ये रुपांतरित करण्यामध्ये मदत करण्यासाठी फॅशन निहाय इमेज ओळखण्याचे तंत्रज्ञान आणि कंटेंट नेटवर्क प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणा-या काऊच फॅशनमध्ये डब्ल्यूएफसीने १.५० लाख अमेरिकन डॉलर्स इतकी गुंतवणूक केली आहे. सीड राउंडचा भाग म्हणून ह्या स्टार्ट अपने निधी उभे केले आहेत आणि ग्राहकांना अधिक उत्पादनांचे ऑफरिंग देण्यासाठी त्यांच्या वापराचे ते नियोजन करत आहे व टीमचा विस्तार करून कंटेंट पार्टनरशिप्स वाढवत आहे.

वी फाउंडर सर्कलचे सीईओ व संस्थापक श्री. नीरज त्यागी यांनी सांगितले की, “महामारीनंतर ज्या उद्योगामध्ये मोठी वाढ झाली असा एक उद्योग हा ई- कॉमर्स आहे. २०२३ पर्यंत भारतातील ई-कॉमर्स मार्केटमध्येच १०० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी वाढ होणे अपेक्षित आहे. परिणामी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व सहभागी करून टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन केले जात आहे. काऊचफॅशनच्या एआय ने सक्षम असलेल्या स्टाईल रिकमेंडेशन इंजिनमुळे ई-कॉमर्सच्या दिग्गज कंपन्यांना अगदी हेच करता येऊ शकते. जेव्हा ह्या ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरून ग्राहकांना एखादे उत्पादन विकत घ्यायचे असते, तेव्हा त्यातील टेक्नोलॉजी सोल्युशनद्वारे रिअल टाईममध्ये युजरला विविध स्टाईल असलेले पर्याय सुचवले जातात.

काऊचफॅशनचे सीईओ व सह- संस्थापक रोहीत जयस्वाल यांनी सांगितले की, '“आम्हांला आनंद आहे की, आमच्या मॉडेलमध्ये डब्ल्यूएफसीने विश्वास ठेवला आहे. त्यांच्या निधींसह अशा धोरणात्मक गुंतवणूकदारांना आमच्यासोबत असण्याबद्दल आम्हांला अतिशय आनंद होत आहे व त्यांच्याकडे उद्योगामधील मोठा अनुभव आहे जो आम्हांला काऊचफॅशनच्या जागतिक पातळीवरील विस्तारासाठी आगामी वर्षांमध्ये आम्हांला अतिशय उपयोगी ठरेल.”