चेन्नई इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा ३१७ धावांनी विजय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नई इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला.

विजयासाठी ४८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ आज सामन्याच्या चौथ्याच दिवशी १६४ धावांमधे गारद झाला.

अक्षर पटेलनं ५, तर आर आश्विननं २ गडी बाद केले. या विजयाबरोबरच ४ सामन्यांच्या या मालिकेत भारतानं इंग्लंडशी १-१ अशी बरोबरी साधली आहे.