मुंबई: एमजी मोटर इंडियाने आज एमजी सबस्क्राइब अंतर्गत झूमकार व ओरिक्ससह मासिक ४९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत झेडएस ईव्ही सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध करून दिली. या ऑफरमुळे योग्य निर्णय घेणाऱ्या ग्राहकांना ३६ महिन्यांसाठी शुद्ध इलेक्ट्रिक इंटरनेट एसयुव्हीचा अनुभव घ्यायला मिळेल.
एमजी मोटर सीएएसई (कनेक्टेड-ऑटोनॉमस-शेअर्ड-इलेक्ट्रिक) या दृष्टीकोनानुसार ग्राहकांना शेअर्ड मोबिलिटीचे पर्याय प्रदान करते. या भागीदारीतून झूमकार आणि ओरिक्ससह झेडएस ईव्हीच्या ग्राहकांना विविध मोबिलिटीचे पर्याय प्रदान केले जातील. सुरुवातीची ऑफर ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी मुंबईत ४९,९९९ रुपये दरमहा अशी उपलब्ध आहे.
झेडएस ईव्ही सध्या मुंबई, पुणे, दिल्ली-एनसीआर आणि बंगळुरू येथे सबस्क्रिब्शनसाठी उपलब्ध आहे. लवकरच यात आणखी शहरे जोडली जातील. या प्रोग्रामअंतर्गत एमजी झेडएस ईव्ही १२, १८, २४, ३० आणि ३६ महिन्यांच्या सबस्क्रिप्शन पर्यायांसह उपलब्ध होते. भागीदारीचा भाग म्हणून एमजी मोटर इंडिया ‘एमजी सबस्क्राइब’ नावाच्या वाहन सबस्क्रिप्शनसाठी झूमकारच्या एंड-टू-एंड टेक्नोलॉजीचा लाभ घेईल. ओरिक्स हा वाहन डिप्लॉयमेंट भागीदार म्हणून व भारतातील सर्वात मोठा शेअर्ड मोबिलिटी प्लॅटफॉर्म म्हणून झेडएस ईव्ही सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध करून देईल.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.