सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांच्या यादीत बिट्टु या लघुपटाची निवड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी, लघु पटाच्या गटात भारतातली निर्मिती असलेल्या बिट्टु या लघुपटाची सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांच्या यादीत निवड झाली आहे. मूळची दिल्लीची पण सध्या मुंबईत वास्तव्याला असलेल्या करीश्मा देव दुबे हीनं या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे. करीश्मानं तिची बहिण श्रेया हिच्यासोबतच या लघुपटाची निर्मिती केली आहे.

या लघुपटानं याआधी स्टुडंट ऑस्कर स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं आहे. आता ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत पहिल्या दहा लघुपटांच्या यादीत समावेश झाल्यानं आनंद झाला असून, लवकरच हा लघुपट भारतातल्या प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करणार असल्याचं करिश्मा हिनं आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image