आकाशवाणी संगीत संमेलन यापुढे पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल - केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाशवाणी संगीत महोत्सव हा आता पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत महोत्सव म्हणुन साजरा होणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात केली.

भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळानं आयोजित केलेल्या अभिवादन या सांगीतिक कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

पंडित भीमसेन जोशी हे जीवनात प्रेरणा देणारे गायक होते भारतात लॉक डाऊनच्या काळात शरद पवार यांनी भीमसेन जोशी यांचे गायन एकले असे प्रेरणा दाई भीमसेन जोशी यांची गाण्याचा ठेवा दूरदर्शन आणि आकाशवाणी कडे मोठा साठा आहे तो आम्ही नव्या स्वरूपात लावणारच सर्वासमोर घेऊन येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

पंडित उपेंद्र भट यांच्या अभिनयानानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

Popular posts
रमजान महिन्यात नमाजासाठी एकत्र जमण्याची परवानगी देता येणार नाही- उच्च न्यायालय
Image
तलिबान सत्तेत आल्यानंनतर अफगाणिस्तानमध्ये ६४००हून अधिक माध्यम प्रतिनिधींनी गमवली नोकरी
Image
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भावेश शेखावत यांनी २५ मिटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात पटकावलं सुर्वण पदक
Image
भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Image
येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
Image