माघवारी जया शुध्द एकादशी निमित्त आज पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न

 

मुंबई (वृत्तसंस्था) : माघवारी जया शुध्द एकादशी निमित्त आज पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. विठ्ठलाची पूजा मंदीर समितीच्या  सदस्य अॅड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत, तर रुक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थित झाली.

माघी एकादशी निमित्त मंदिरात  फुलांची आकर्षक आरास केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीर समितीनं  आवश्यक उपाययोजना केल्या आल्या होत्या.