कबड्डी, खो-खो, मल्लखांब इत्यादी देशी खेळांसाठीची मैदानं विकसित करावीत - अदिती तटकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : फुटबॉल किंवा व्हॉलिबॉलसारख्या मैदानांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे त्याऐवजी कबड्डी, खो-खो, मल्लखांब इत्यादी देशी खेळांसाठीची मैदानं विकसित करावीत, अशी सूचना क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे. त्यांनी काल रत्नागिरीत क्रीडा तसंच पर्यटन विभागाच्या कामांची माहिती घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्ह्यातल्या सर्व क्रीडासंकुलांची आणि इतर क्रीडासुविधांची कामं लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातल्या क वर्गातल्या पर्यटनस्थळांचा दर्जा बदलून ती स्थळं ब वर्गात रूपांतरित करण्यातचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी जिल्हा परिषदेला केली.