तीरा कामतच्या औषधासाठी आयात कर माफ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या एका पाच महिन्यांच्या बालिकेच्या उपचारासाठी आवश्यक औषधी अमेरिकेतून आयात करण्यासाठी लागणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय त्वरित घेतल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

तीरा कामत ही पाच महिन्यांची बालिका असून, तिला जीन रिप्लेसमेंट उपचारांची नितांत गरज आहे. पुढील उपचारासाठीचं औषध अमेरिकेतून आयात करावं लागणार होतं. या औषधावरील सर्व करांतून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्र्यांना पत्र पाठवून विनंती केली होती. अमेरिकेहून औषधे मागवण्यासाठी १६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.