जेवर विमानतळ आशियातलं सर्वात मोठं विमानतळ म्हणून विकसित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातलं जेवर विमानतळ आशियातलं सर्वात मोठं विमानतळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून काल विधासभेत सादर झालेल्या २०२१-२२ या वर्षासाठीच्या अंदाज पत्रकात या विमानतळासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या विमानतळावर एकंदर ६ धावपट्ट्या असणार आहेत. त्याचबरोबर अयोध्येमध्ये उभारल्या जात असलेल्या आंतर राष्ट्रीय विमानतळाला मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम असं नाव दिलं जाणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात एकशे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अलीगड, मुरादाबाद, मेरठ या सारख्या शहरांनाही लवकरच विमान सेवेद्वारा जोडण्यात येईल असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल वार्ताहरांना सांगितलं.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image