चित्रपट अभिनेते आणि निर्माता दिग्दर्शक राजीव कपूर याचं निधन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : चित्रपट अभिनेता आणि निर्माता दिग्दर्शक राजीव कपूर याचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. मुंबईत चेंबूर इथं राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज कपूर यांचे ते धाकटे पुत्र होते. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटानं त्यांची चित्रपटसृष्टीतली कारकीर्द सुरु झाली. ’ एक जान है हम’, ‘झलझला’,’ लव्ह मॅरेज’ आदी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी ‘प्रेम ग्रंथ’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर छायाचित्र शेअर करत राजीव कपूर यांना आदरांजली वाहिली आहे. गेल्या वर्षी ऋषी कपूर यांच्या निधनानंतर कपूर घराण्यावर झालेला हा दुसरा आघात धक्कादायक असल्यानं चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.