पंडित भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा असून तो जपला पाहिजे- नितीन गडकरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंडित भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, तो जपला पाहिजे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ‘स्वरभास्कर’ पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘खयाल यज्ञ’ या संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद घेतला.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधून गडकरी यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आणि सहभागी कलाकारांचं अभिनंदन केलं. भीमसेन जोशी यांनी आपल्या अजरामर गायनातून, संगीत सेवा केली. या संगीत यज्ञातून पंडीतजींच्या स्मृती जागवून त्यांना आपण अभिवादन केलं, ही चांगली गोष्ट आहे. हा 'खयाल यज्ञ 'महोत्सव, रसिकांच्या हुदयात कोरला जाईल, असही गडकरी यावेळी म्हणाले. पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुरू असलेल्या या महोत्सवाचा समारोप, उद्या होणार आहे.

Popular posts
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Image