मुंबईत २८ केंद्रांवर १३ हजार ९१४ लाभार्थ्यांचं कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल एकूण २८ केंद्रांवर १३ हजार ९१४ लाभार्थ्यांचं कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण झालं अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनानं दिली आहे. काल १० हजार ३०० लाभार्थ्यांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट होतं, मात्र त्यापेक्षा अधिक म्हणजे १३३ टक्के लसीकरण झाल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.

काल लस दिलेल्यांपैकी ९ हजार ४७० जण आरोग्य कर्मचारी होते, तर ४ हजार ४४४ जण आघाडीवर काम करत असलेले कोरोनायोद्धे होते. यापैकी एकूण ११ हजार २७४ जणांना लसीची पहिली मात्रा दिली गेली, तर २ हजार ६४९ जणांना लसीची दुसरी मात्रा दिली असं प्रशासनानं कळवलं आहे.

दरम्यानं आत्तापर्यंत राज्यभरात सुमारे ८ लाख ९० हजार लाभार्थ्यांचं लसीकरण झालं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image