माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थ व्यवस्थेचा एक मुख्य आधारस्तंभ आहे; कोरोना टाळेबंदीमुळे जेव्हा संपूर्ण देश चार भिंतींच्या आत जखडून गेला होता तेव्हा आय टी क्षेत्रातल्या प्रतिभावंतांनी आपलं योगदान सुरू ठेवत अर्थव्यवस्थेला हातभार लावला अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचा गौरव केला.
नॅसकॉम टेक्नॉलॉजी अॅण्ड लीडरशिप फोरमला काही वेळापूर्वी संबोधित करताना मोदी म्हणाले की कोविड साथीच्या या कठीण काळात संपूर्ण जग भारताकडे अत्यंत विश्वासाने पाहत आहे. हा नवा भारत आणखी विकास, आणखी प्रगतीसाठी उत्सुक आहे.
नॅसकॉमची ही २९वी परिषद येत्या १९ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. राष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या नॅसकॉमचा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. 'Shaping the future towards a better normal' अर्थात "नव्यानं पूर्वपदावर येण्यासाठी भविष्यनिर्माण" ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे.
या परिषदेत ३० पेक्षा जास्त देशांचे १६०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत ३० हून अधिक उत्पादने सादर केली जाणार आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.