आयएनएफएसचा विनामूल्य ‘बेसिक न्युट्रिशन व फिटनेस कोर्स’

 


मुंबई: देशातील सर्वात मोठी फिटनेस सर्टिफिकेशन इन्स्टिट्यूट आयएनएफएस या संस्थेने विनामूल्य ‘बेसिक न्युट्रिशन व फिटनेस कोर्स’ सुरु केला आहे. याद्वारे लोकांना पोषण आणि आरोग्याविषयी माहिती मिळण्यास मदत होईल. नवशिक्यांसाठी फिटनेस व आरोग्यामागील शास्त्र अगदी सोप्या पद्धतीने समजवून सांगणे व यासंबंधी पार्श्वभूमी तयार करणे हा ‘ बेसिक न्युट्रिशन व फिटनेस कोर्स’ चा उद्देश आहे.

या बेसिक मोफत कोर्समध्ये विद्यार्थ्यांना पोषण, आहार आणि व्यायामाची मूलभूत तत्त्वे तर शिकता येतीलच, पण यासोबतच, स्वत:चा आहार आणि कामांचा आराखडाही तयार करता येईल. आयएनएफएसच्या विद्यार्थ्यांना अनुभवी प्राध्यापकांशी संपर्क साधता येईल. बेसिक न्युट्रिशन व फिटनेस कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आयएनएफएसच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यांना तज्ञांमार्फत विविध कॉलेज व विद्यापीठांतून प्रशिक्षण दिले जाईल. या सर्वांना आयएनएफएसकडून सर्टिफिकेशन मिळेल.

आयएनएफएसच्या संस्थापक कु. ज्योती दबस  म्हणाल्या, “आयएनएफएसमध्ये कुशल फिटनेस व्यावसायिक तयार करण्यासाठी आम्ही अनेक ऑनलाइन सर्टिफिकेशन कोर्स प्रदान करत आहोत. याद्वारे हजारोंचे आयुष्य उंचावत आहोत. आयएनएफएसमध्ये आम्ही पहिला मोफत कोर्स लाँच करण्याचे ठरवले तेव्हा, पोषण आणि आरोग्याची मूलभूत शास्त्रीय तत्त्वे नवशिक्यांना समजावून सांगणे, हाच यामागील अजेंडा होता. आरोग्याप्रती उत्साही असलेल्या प्रत्येकाला परवडेल असा हा बेसिक कोर्स प्रदान करत आम्ही एक परिवर्तन घडवण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

Popular posts
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Image