कोविड लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या १६ तारखेपासून देशभरात सुरू होणाऱ्या कोविड लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.

विविध राज्यांमधली कोविडस्थिती तसंच लसीकरणीच्या तयारीबाबत या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल विविध राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरदृष्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून कोव्हिन अॅपसंदर्भात चर्चा केली.

सर्व राज्यांचे प्रधान सचिव, राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचे मोहीम संचालक, आणि इतर अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image