प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून नव्या अमेरिकी नेतृत्वाचे स्वागत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ज्यो बायडेन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे, की अमेरिका आणि भारत दरम्यान धोरणात्मक भागीदारी अजून मजबूत करण्यासाठी बायडन यांच्या बरोबर काम करायला आपण उत्सुक आहोत.

सध्याच्या काळातील दोन्ही देशांसमोरील समान विविध आव्हाने आणि जागतिक शांतता आणि वैश्विक सुरक्षा याबाबत दोन्ही देशांची एकजूट आहे. भारत आणि अमेरिका दरम्यान वाढत आर्थिक सहकार्यासह दोन्ही देशाच्या नागरिकांमधील वाढते स्नेह संबंध यामुळे बहुपक्षीय कार्यक्रम सुरू आहेत, दोन्ही देशांचे मजबूत संबंध नवीन उंचीवर नेण्यासाठी भारत कटीबद्ध असल्याचे ही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

प्रधानमंत्री मोदी यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना ही त्यांच्या सफल कार्यकालासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पहिल्या महिला उपराष्ट्रपती म्हणून ही जबाबदारी संभाळण ही ऐतिहासिक संधी असून, दोन्ही देशांचे संबंध अधिक प्रगाढ करण्यासाठी त्यांच्या बरोबर काम करण्यास आपण उत्सुक आहोत असे प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तासाभरातच ज्यो बायडेन यांनी पूर्व राष्ट्रपती डोनाल्ड तर ट्रम्प यांचे अनेक निर्णय रद्द करत १५ नवीन निर्णयांच्या अधिसुचनांवर सही केली. त्यानुसार मुख्यत कोरोना संदर्भातील काही महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये अमेरिकेतील नागरिकांना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच जागतिक दृष्ट्या महत्वपूर्ण निर्णय जाहीर करताना, जागतिक आरोग्य संघटनेमध्ये आणि पर्यावरणदृष्ट्या महत्वपूर्ण पॅरिस करारात अमेरिकेने पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.