पहिल्या टप्प्यातल्या ३ कोटी कोविड योद्ध्यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार - प्रधानमंत्र्यांची माहिती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविड-१९ वरील लसीकरणाला येत्या शनिवारी सुरुवात होत असून; पहिल्या टप्प्यातल्या ३ कोटी कोविड योद्ध्यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं.

प्रधानमंत्र्यांनी काल कोरोना लसीकरणासंदर्भात देशातल्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा केली; त्यावेळी ते बोलत होते. देशात येत्या काही महिन्यांत ३० कोटी लोकांना लस देण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं मोदी म्हणाले.

लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्यानं सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला; त्याचवेळी लसीकरणासंदर्भातल्या सर्व शंकांचं यावेळी निरसन करण्यात आलं.