राज्यात २९० केंद्रांवर २४ हजार २८२ आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २९० केंद्रांवर २४ हजार २८२ म्हणजे उद्दिष्टाच्या ८३  टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात काल सर्वात जास्त गोंदिया जिल्ह्यात १४३ टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ गडचिरोली, वर्धा, अमरावती, जालना, बीड, धुळे, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले.

सोमवारपासून मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. ३१  जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्याने ३० जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही. काल सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते, त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो.

राज्यात आतापर्यंत एकंदर ९९,२४२ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात काल २९७ जणांना कोवॅक्सिन लस देण्यात आली असून आतापर्यंत एकंदर १५७२ जणांना ही लस देण्यात आली आहे.

काल सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी आहे. यामध्ये दैनंदिन लसीकरण झालेले कर्मचारी, टक्केवारी आणि आतापर्यंतची एकूण संख्या आहे. अकोला (२५८, ८६ टक्के, ११०६), अमरावती (५७५, ११५ टक्के, २३८६), बुलढाणा (४६९ , ७८  टक्के, २११७), वाशीम (२३३७८  टक्के, ११३१ ), यवतमाळ (३२९ , ७३ टक्के, १७८८ ), औरंगाबाद (९३६, ७२टक्के, ३१३७), हिंगोली (२०८, १०४ टक्के, ९७६), जालना (४५२, ११३ टक्के, १६८५), परभणी (१७३, ४३ टक्के, १३२२), कोल्हापूर (८४८, ७७टक्के, ३५०४), रत्नागिरी (३४१, ६८ टक्के, १४५५), सांगली (८७१, ९७ टक्के, २७३९), सिंधुदुर्ग (२१०, ७० टक्के, ९१०), बीड (५५४, १११ टक्के, २२६२), लातूर (५९५, ९९ टक्के, २१०७), नांदेड (५२०, १०४ टक्के, १६७७), उस्मानाबाद (३०१, १०० टक्के, १३०१), मुंबई (१४८४, ९३ टक्के, ४७६६), मुंबई उपनगर (२०६६, ७० टक्के, ७३९३), भंडारा (२६३, ८८ टक्के, १२३८), चंद्रपूर ( ४७६, ७९ टक्के, २१७७), गडचिरोली (५४२, १३६ टक्के, १५७० ), गोंदिया (४२८, १४३ टक्के, १२६७), नागपूर (१०५६, ८८टक्के, ४७६७), वर्धा (७१५, ११९ टक्के, २६४५), अहमदनगर (८७०, ७३ टक्के, ३९०६), धुळे (४३५, १०९ टक्के, १८९१), जळगाव (६६४, ८६ टक्के, २५७०), नंदुरबार (३०८, ७७ टक्के, १४७५), नाशिक (७३३, ५६ टक्के, ४०३६), पुणे (१८५३, ६० टक्के, ८२५१), सातारा (७७२, ८६ टक्के, ३४७२), सोलापूर (१०८२. ९८ टक्के, ४६०३), पालघर (३१४, ७९ टक्के,१५९०), ठाणे (२२०१, ९६ टक्के, ९०४०), रायगड (१८०, ४५ टक्के, ९८२)

Popular posts
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल पियुष गोयल यांच्याकडून समाधान व्यक्त
Image
कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image