राज्यात काल ४१ हजार ४७० आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५२८ केंद्रांवर ४१ हजार ४७० म्हणजेच ७७ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले.

राज्यात काल गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक १२६ टक्के लसीकरण झाले असून, त्या पाठोपाठ सातारा, धुळे, जालना, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले.

राज्यात आतापर्यंत १ लाख ७८ हजार ३७१ कर्मचाऱ्यांना लस दिली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.